रेल्वेत गुंगीचं औषध देऊन परदेशी पर्यटकांना लुटलं

गुंगीचे औषध देवून परदेशी पर्यटकाचा ९१०० डॉलर किमतीचा ऎवज चोरीस गेल्याची घटना एर्णाकुलम - हजरत निजामुद्दीन मंगला एक्सप्रेसमध्ये घडलाय. मनमाड लोहमार्ग पोलिसांनी याबाबत चोरीचा गुन्हा दाखल केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 10, 2014, 11:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मनमाड
गुंगीचे औषध देवून परदेशी पर्यटकाचा ९१०० डॉलर किमतीचा ऎवज चोरीस गेल्याची घटना एर्णाकुलम - हजरत निजामुद्दीन मंगला एक्सप्रेसमध्ये घडलाय. मनमाड लोहमार्ग पोलिसांनी याबाबत चोरीचा गुन्हा दाखल केलाय.
बेल्जियम देशातील केव्ही हा ३२ वर्षीय पर्यटक भारत भ्रमंतीसाठी आला होता. कोकण दर्शन आटोपून मायदेशी परतण्यासाठी रत्नागिरी येथून तो दिल्लीला जात होता. मंगला एक्सप्रेसने जनरल डब्यातून प्रवास करीत होता. त्याच्या सहप्रवाश्याने त्यास खाद्यपदार्थातून गुंगीचे ओषध दिले. त्यास गुंगी येताच त्याच्याकडील महागडा किमतीचा कॅमेरा, लेन्स आणि रोख रक्कम मिळून ९१०० डॉलर किमतीचा ऎवज लांबविला.
भारतीय रुपयांमध्ये हा ऐवज जवळपास ५ लाख रुपयांचा आहे. बराच वेळ परदेशी पर्यटक झोपेत असल्याचं इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी मनमाड लोहमार्ग पोलिसांना कळविले. त्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. 

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.