एलिफंटा बोट दुर्घटनेत 10 महिन्यांचे बाळ आश्चर्याकारकरित्या बचावले; गोव्यावरुन आलेलं अर्ध कुटुंब संपलं

 गोव्यावरून आलेल्या माय लेकाचा मुंबई बोट दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. मात्र, 10 महिन्यांचे बाळ बचावले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 19, 2024, 10:11 PM IST
एलिफंटा बोट दुर्घटनेत 10 महिन्यांचे बाळ आश्चर्याकारकरित्या बचावले; गोव्यावरुन आलेलं अर्ध कुटुंब संपलं title=

Elephanta Caves Boat Accident : 18 डिसेंबर रोजी मुंबईच्या गे वे ऑफ इंडिया येथील समुद्रात मृत्यूचा थरार पहायला मिळाला.  एलिफंटाकडे जाणा-या नीलकमल बोटीला नेव्हीच्या बोटीनं धडक दिली आणि 110 जणांचा जीव धोक्यात आला. बोट उलटल्यानंतर या सगळ्यांची समुद्रात मृत्यूशी झुंज सुरू झाली. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती. एलिफंटा बोट दुर्घटनेत 13 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गोव्यावरून आलेल्या माय लेकाचा देखील समावेश आहे. या दुर्घटनेत 10 महिन्यांचे बाळ आश्चर्याकारकरित्या वाचले आहे.  

एलीफंटा बोट दुर्घटनेमुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्थ झालेय. या दुर्घटनेत एकूण 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मृतांपैकी 11 जणांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्याकडे सोपाविण्यात आलेत तर एका लहान मुलाचा मृतदेह अद्यापही बेपत्ता आहे
गोवा वरून सोनाली गावंढळ ही पासपोर्ट वेरिफिकेशनसाठी मुंबईला आली होती. तिच्या सोबत तिची मोठी बहीण, नवरा आणि त्यांची 2 लहान मुलं 2 दिवस मुंबई फिरण्यासाठी म्हणून आली होती. दरम्यान मुंबईत आल्यावर बोटीने एलीफंटा जाण्याचा प्लॅन झाला. मात्र, बोट दुर्घटनेमुळे सर्व होत्याच नव्हतं झालंय. सोनालीची बहीण सकीना पठाण आणि तिचा 6 वर्षीय चिमुकल्याचा या बोट दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला असून सफीनाचा मृतदेह उरण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलाय. तर 6 वर्षीय चिमुकला अद्यापही बेपत्ता आहे.  

दुर्घटना घडली त्यावेळी लाईफ जॅकेट घातले नव्हते स्पीड बोट धडकल्यानंतर बोटीत पाणी शिरू लागल्यावर लाईफ जॅकेट घालण्यास सांगण्यात आले. बोटीत केवळ 50 लाईफ जॅकेट होते त्यामुळे अनेकांना लाईफ जॅकेट मिळाले नाहीत असा गंभीर आरोप देखील सोनालीने केला आहे. आम्ही बोटीच्या वरच्या बाजूला होतो तर बहीण खाली होती तीला लाईफ जॅकेट मिळाले नाही. बोट बुडू लागली तसे खाली असलेले लोकं पाण्यात बुडाले त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण हाती काहीच लागले नाही. सकीनाचा मृतदेह तरी सापडला मात्र 6 वर्षीय चिमुकला अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती सोनालीने दिली. 

सोनाली स्वतः बोटीला धरून राहिल्याने वाचली तर बहिणीच्या नवऱ्याने एका हाताने बोट पकडली तर दुसऱ्या हाताने 10 महिन्याच्या बाळाला जिवाच्या आकांताने पकडत त्याचा जीव वाचवला. कुठून दुर्बद्धी सुचली आणि आम्ही फिरायला इथे आलो अशी प्रतिक्रिया सोनालीने व्यक्त केलेय

नेरुळच्या प्रज्ञा कांबळेचा दुर्दैवी मृत्यू 

मुंबईत झालेल्या बोट दुर्घेटनेत नेरूळ येथे राहणार्या प्रज्ञा कांबळे यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. नातेवाईकसोबत त्या  फिरायला गेले असताना त्याचा दुर्घटनेत मृत्यू झाला, त्यांच्यावर नेरूळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रज्ञा कांबळे यांना मुलगा आणि मुलगी असून दोघे कॅालेजचे शिक्षण घेत आहेत. प्रज्ञा कांबळे या नोकरी करीत  आपल्या दोन मुलांचे शिक्षण  करीत होत्या. मात्र आता त्यांचा मृत्यू झाल्याने दोन मुलांना आईचे प्रेम गमवावे लागले आहे.