www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना गुड न्यूज आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी लक्षात घेऊन विशेष जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. मडगाव आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने केला आहे.
१६ नोव्हेंबर २०१३ रोजी मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस (रेल्वे क्रमांक ००११२ ) ही गाडी दुपारी १.०० वाजता मडगाववरून सुटेल ती लोकमान्य टिळक टर्मिनसला मध्य रात्री १२.१५ वाजता पोहोचेल. तर दुसऱ्यादिवशी १७ नोव्हेंबरला मडगावसाठी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून ००१११ ही गाडी रात्री १२.५५ वाजता सुटेल ती दुपारी १२.३० वाजता मडगावला पोहोचेल. या गाडीला १८ डबे असतील.
तर १७ नोव्हेंबर २०१३ रोजी मडगावहून ००११४ मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी सायंकाळी ५.०० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता पोहोचेल. तर ००११३ ही रेल्वे १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.०० वाजता मडगावसाठी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल ती सायंकाळी ४.३० वाजता पोहोचेल. ही गाडी १८ डब्यांची असेल.
दोन्ही विशेष रेल्वे गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, थिविंम, आणि करमाळी या स्थानकावर थांबणार आहेत, असे कोकण रेल्वे तर्फे सांगण्यात आली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.