सर्वात जलद निकाल : फाशीची शिक्षा

नवी मुंबईत चिमुरडीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी दत्तात्रय रोकडे याला फाशी सुनावण्यात आलीय. ठाणे न्यायालयानं हा निकाल सुनावलाय. महत्त्वाचं म्हणजे, केवळ दोन महिन्यातच खटल्याचा निकाल लागलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 7, 2013, 05:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
नवी मुंबईत चिमुरडीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी दत्तात्रय रोकडे याला फाशी सुनावण्यात आलीय. ठाणे न्यायालयानं हा निकाल सुनावलाय. महत्त्वाचं म्हणजे, केवळ दोन महिन्यातच खटल्याचा निकाल लागलाय.
बलात्कार आणि हत्या प्रकरणातला राज्यातलाच नाही तर देशातला हा पहिलाच जलद निकाल लागलेला खटला आहे. २३ जानेवारी २०१३ रोजी कोपरी गावातील पाच वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करून तिच्यावर बलाक्तार झाला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी नवी मुंबई पोलीसांनी २५ जानेवारीला मुलीच्याच चाळीत राहणारा दत्तात्रय रोकडे हा ५३ वर्षीय आरोपीला अटक केली होती. याप्रकरणी केस प्रथम वाशी कोर्टात सुरु होती. मात्र, घटनेचे गांभीर्य बघता ही केस ठाणे कोर्टात वर्ग करण्यात आली.

याप्रकरणी खटला प्रथम वाशी कोर्टात सुरु होता. मात्र घटनेचे गांभीर्य बघता हा खटला ठाणे कोर्टात वर्ग करण्यात आला. आज या खटल्याचा निकाल लागलाय. न्यायमूर्ती टी. एच. माळी यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.