चिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणात युवराजचं कुटुंब अडकणार?

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याचे कुटुंबीय सध्या एका गंभीर प्रकरणात अडकलंय. त्यांच्याच एका नातेवाईकानं आपल्या आठ वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्यूला सिंग कुटुंबीय जबाबदार असल्याचं म्हटलंय. 

Updated: Apr 22, 2016, 10:57 AM IST
चिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणात युवराजचं कुटुंब अडकणार? title=

हरियाणा : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याचे कुटुंबीय सध्या एका गंभीर प्रकरणात अडकलंय. त्यांच्याच एका नातेवाईकानं आपल्या आठ वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्यूला सिंग कुटुंबीय जबाबदार असल्याचं म्हटलंय. 

पंचकुलाच्या सेक्टर-४ मध्ये एमडीसी पॉवर हाऊसमध्ये क्रिकेट युवराज सिंहची कोठी आहे... इथंच त्याची आई शबनम यांचा बंगलादेखील आहे. या बंगल्याच्या डागडुजीचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. 

याच दरम्यान काही दिवसांपूर्वी या बंगल्याचा अवजड असा लोखंडी दरवाजा अंगावर कोसळून इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या कुलदीप या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. 

एका लहान मुलानं हलवल्यानं हा भारी वजनाचा दरवाजा कसा पडू शकेल? असा सवाल आता त्याच्या कुटुंबीयांनी केलाय. याघटनेमागचा बेजबाबदारपणा सिंग कुटुंबीयांना भारी पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.