1830 कोटींचा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर अल्लू अर्जुन करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू? संजय लीला भन्साळींसोबत नियोजन सुरु

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या चित्रपट 'पुष्पा 2' च्या यशाचा आनंद घेत आहे. हा त्याचा करिअरमधील एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे. परंतु अल्लू अर्जुन काल मुंबईत दिसला आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली.    

Intern | Updated: Jan 10, 2025, 01:08 PM IST
 1830 कोटींचा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर अल्लू अर्जुन करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू? संजय लीला भन्साळींसोबत नियोजन सुरु title=

पुष्पा 2 हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि नुकताचं या चित्रपटाचा आणखी 20मिनिटे भाग वाढवण्यात आला आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच काही वादांमध्ये अडकला होता. त्यामुळे सुपरस्टारला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला होता. हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात त्याला नामपल्ली कोर्टाने नुकताच जामीन दिला आहे. यानंतर त्याने सेलिब्रेशन केल्यानंतर त्याच्या करिअरकडेही लक्ष देण्यास सुरूवात केली आहे.

कालचं अल्लू अर्जुन मुंबईत दिसला आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो संजय लीला भन्साळींच्या ऑफिसबाहेर दिसत आहे. 9 जानेवारीला तो भन्साळींच्या ऑफिसमधून बाहेर पडताना पाहिला गेला.  त्याचं आणि भन्साळींचं आगामी प्रोजेक्ट काय असणार आहे, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली गेलेली नाही.

'पुष्पा'च्या यशानंतर अल्लू अर्जुन बॉलिवूडमध्ये आपली ओळख मजबूत करण्यासाठी सज्ज झाला आहे आणि चाहत्यांमध्ये त्याच्या आगामी कामाबद्दल उत्सुकता आहे. या चर्चांना अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

त्याचबरोबर अल्लू अर्जुनने आपला पुढील चित्रपट सुरू करण्यापूर्वी दिर्घ ब्रेक घेण्याची योजना केली असल्याची चर्चा आहे. संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात, 3 जानेवारी रोजी नामपल्ली न्यायालयाने अल्लू अर्जुनच्या बाजूने निकाल दिला आणि त्याला सामान्य अटींवर जामीन मंजूर केला. यामुळे त्याला मोठा दिलासा मिळाला आहे, कारण त्याला या कायदेशीर लढाईमधून मुक्तता मिळाली आहे.

हे ही वाचा: 'बाल बाल जच गई', 2025 मध्ये श्रद्धा कपूरने बदलला लूक, चाहते म्हणाले, 'ती.....'

संजय लीला भन्साळीचे आगामी प्रोजेक्ट्स 
संजय लीला भन्साळी यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या ते दोन प्रोजेक्टवर काम करत आहेत. ज्यामध्ये प्रथम रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांचा चित्रपट 'लव्ह अँड वॉर' आणि दुसरे म्हणजे त्यांच्या पहिल्या वेब सीरिज 'हिरामंडी'चा दुसरा सीझन आहे. चाहते त्यांच्या दोन्ही प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.  त्याच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटाची रिलीज डेट 2026 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्याचा एक खास चित्रपट असणार आहे. सध्या 'हिरमंडी' बाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही.