युसूफच्या घरी चिमुरड्याचं आगमन

कोलकता नाईट रायडर्सचा धमाकेदार खेळाडू आणि टीम इंडियात खेळलेल्या युसूफ पठाणच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. 

Updated: Apr 22, 2016, 10:13 AM IST
युसूफच्या घरी चिमुरड्याचं आगमन title=

नवी दिल्ली : कोलकता नाईट रायडर्सचा धमाकेदार खेळाडू आणि टीम इंडियात खेळलेल्या युसूफ पठाणच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. 

युसुफच्या पत्नीनं - आफरीन हिनं गुरुवारी सकाळी एका मुलाला जन्म दिलाय. युसुफ पठाणचा भाऊ इरफान पठाणननं ट्विट करून ही माहिती दिलीय.

'मुबारका मेरे भाई... अल्लाह बच्चे को अच्छी सेहत दे' असं ट्विट इरफाननं केलंय. 

युसुफ आणि आफरीन यांचं हे दुसरं अपत्य आहे. २०१४ मध्ये आफरीनं आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. 

युसुफनं टीम इंडियासाठी २००७ मध्ये आपला डेब्यू केला होता. टी२० फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध ओपनिंग करण्याची संधी युसुफला मिळाली होती.