नवी दिल्ली : आज सायंकाळी भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट युद्ध रंगणार आहे. या युद्धात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारताच्या विजयासाठी प्रार्थना करतोय.
तो काही भारताचा फॅन आहे म्हणून भारताच्या विजयाची आशा करत नाही तर स्वत:साठी त्याला हे करावं लागतंय.
वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी, दाऊदला सट्टेबाजीत जवळपास १५०० करोड रुपयांचं नुकसान झालंय. ही रक्कम डी कंपनीसाठीही खूप मोठी आहे. त्यामुळेच, त्यांना चांगलाच धक्का बसलाय.
आता, भारत-पाकिस्तान मॅचदरम्यानही दाऊदनं अरबो रुपये सट्टेबाजीत लावलेत. भारताच्या विजयानंतर त्याला यात फायदा होणार आहे. जवळपास १२ देशांमध्ये दाऊदचा हा सट्टेबाजीचा धंदा फैलावलेला आहे. नुकताच, त्यानं आपला हा धंदा आपला छोटा भाऊ अनीस इब्राहिम याच्या ताब्यात दिल्याचंही वृत्त आलं होतं.
आता, आज सायंकाळी भारत वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध आपला विजयाचा झेंडा कायम ठेवतो की पाकिस्तान भारताला पराभूत करत इतिहास रचतोय, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.