नागपूर टी-२०मध्ये टीम इंडियाने का बांधली होती काळी पट्टी...

 भारतीय अंडर १९ क्रिकेट टीमचे फिटनेस ट्रेनर राजेश सावंत आणि तेज गोलंदाज मोहम्मद शमीचे वडील यांचे निधन झाल्यामुळे भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात हाताला काळी पट्टी बांधली होती. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 31, 2017, 04:29 PM IST
नागपूर टी-२०मध्ये टीम इंडियाने का बांधली होती काळी पट्टी... title=

नागपूर :  भारतीय अंडर १९ क्रिकेट टीमचे फिटनेस ट्रेनर राजेश सावंत आणि तेज गोलंदाज मोहम्मद शमीचे वडील यांचे निधन झाल्यामुळे भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात हाताला काळी पट्टी बांधली होती. 

सावंत यांचे सकाळी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांनी सांगितले की हृदयविकाराचा झटक्याने सावंत यांचा मृत्यू झाला होता. सावंत शेष भारतच्या टीमशी संबंधीत होते. या संघाने गेल्या आठवड्यात ईराणी कपमध्ये गुजरातला पराभूत केले होते. 

इंग्लंडच्या अंडर १९ टीम विरूद्ध ३० जानेवारी होणाऱ्या पहिल्या वन डेसाठी भारतीय संघासोबत सावंत मुंबईत होते. दोन दिवसापूर्वी शमी यांचे वडील तौसीफ अली यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे शमीला टीम सोडून अमरोहा येथे जावे लागले होते.