सीरिज जिंकण्यासाठी विराटला या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना उद्या बंगळूरुमध्ये खेळवला जाणार आहे. या अखेरच्या सामन्यात बाजी मारणारा संघ मालिका खिशात घालेल.

Updated: Jan 31, 2017, 03:28 PM IST
सीरिज जिंकण्यासाठी विराटला या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे title=

बंगळूरु : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना उद्या बंगळूरुमध्ये खेळवला जाणार आहे. या अखेरच्या सामन्यात बाजी मारणारा संघ मालिका खिशात घालेल.

कसोटी आणि वनडे मालिका गमावल्यानंतर तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंड मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल तर दुसरीकडे टीम इंडियाही जिंकण्यासाठी सज्ज झालीये.

इयॉन मॉर्गन आणि कंपनीने कानपूरमधील टी-२०मध्ये बाजी मारली. मात्र दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास हिरावून घेत मालिकेत बरोबरी केली. तिसरा टी-२० सामना जिंकण्यासाठी विराट कोहलीला मोठी मेहनत घेणे गरजेचे आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत भारताच्या फलंदाजांनी तितकीशी समाधानकारक कामगिरी केली नाही. यातच तिसऱ्या सामन्यात मात्र भारताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. पहिल्या ११ खेळाडूंमध्ये कोणाला स्थान द्यावे याबाबत विचार करणे गरजेचे आहे. मनीष पांडेने दोन्ही सामन्यात निराशा केली. युवराजचीही कामगिरी या दोन सामन्यात हवी तितकी चांगली कामगिरी झालेली नाही. 

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराटने दोन्ही सामन्यात सलामीवीराची भूमिका बजावलीये. यादरम्यान त्याने चांगली फलंदाजी केली मात्र तो मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. पहिल्या सामन्यात लोकेशकडून चांगली कामगिरी झाली नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात सलामीला येताना त्याने ७२ धावा तडकावल्या. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा असेल. 

किमान दोन फलंदाजांनी मोठी खेळी करणे गरजेचे 

पहिल्या दोन्ही सामन्यांत भारत मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. ही चूक तिसऱ्या सामन्यात करुन चालणार नाही. भारताला फलंदाजीमध्ये सुधारणा करावीच लागेल. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी किमान दोन फलंदाजांना मोठी खेळी करणे गरजेचे आहे. रैना, धोनी आणि कर्णधार विराट कोहलीकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. 

इंग्लंडच्या फलंदाजांना रोखणे गरजेचे 

सध्या इंग्लंडच्या टीममध्ये जेसन रॉय, सॅम बिलिंग्स, इयॉन मॉर्गन, जोश बटलर आणि बेन स्टोक्स यासारखे आक्रमक फलंदाज आहेत. त्यांना रोखणे भारतासाठी गरजेचे आहे.