व्हिडिओ : पाकला वाचविण्यासाठी तुटलेल्या हाताने वहाब रियाद उतरला बॅटिंगला

श्रीलंकेविरूद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्यात वहाब रियाद याने पाकिस्तानला पराभवापासून वाचविण्यासाठी फ्रॅक्चर हाताने फलंदाजीसोबत गोलंदाजीही केली. वहाबने अशी हिम्मत दाखवली की ती पाहून जगभरातील क्रिकेट फॅन्सने त्याची प्रशंसा केली. 

Updated: Jun 30, 2015, 08:25 PM IST
व्हिडिओ :  पाकला वाचविण्यासाठी तुटलेल्या हाताने वहाब रियाद उतरला बॅटिंगला title=

गाले : श्रीलंकेविरूद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्यात वहाब रियाद याने पाकिस्तानला पराभवापासून वाचविण्यासाठी फ्रॅक्चर हाताने फलंदाजीसोबत गोलंदाजीही केली. वहाबने अशी हिम्मत दाखवली की ती पाहून जगभरातील क्रिकेट फॅन्सने त्याची प्रशंसा केली. 

दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये श्रीलंकेचा गोलंदाज दुषमंता चमीराचा चेंडू वहाबच्या ग्लोजला लागला. त्यामुळे त्या या सिरीजमधून बाहेर जावेल लागले. परंतु, जखमी असताना पाकिस्तानला त्याची गरज होती तेव्हा त्याने न डगमगता आपली जबाबदारी स्वीकारली. हात फ्रॅक्चर असताना वहाब ९ ओव्हर गोलंदाजी केली आणि १९ रन देऊन २ मेडन ओव्हर टाकल्या. 

पाहा व्हिडिओ 

इतकेच नव्हे तर ९ विकेट गमावल्यावर पाकिस्तानचा संघ संकटात आला होता. तेव्हा वहाब फलंदाजीसाठी उतरला त्याने आऊट होण्यापूर्वी एका हाताने ११ चेंडूचा सामना केला आणि एक चौकारासह ६ धावा केल्या. वहाबची हिम्मत पाहून श्रीलंकेच्या फॅन्सनेही त्याची प्रशंसा केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.