इंग्लंडला हरवल्यानंतरही भारताची वनडे क्रमवारीत घसरण

वनडे सीरिजमध्ये इंग्लंडचा 2-1नं पराभव केल्यानंतरही भारताची आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे.

Updated: Feb 5, 2017, 05:36 PM IST
इंग्लंडला हरवल्यानंतरही भारताची वनडे क्रमवारीत घसरण  title=

मुंबई : वनडे सीरिजमध्ये इंग्लंडचा 2-1नं पराभव केल्यानंतरही भारताची आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे. आयसीसीनं जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर गेला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा 2-0नं पराभव केल्यामुळे न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेचा 5-0नं पराभव केला तर आफ्रिकेची टीम नंबर एक होईल.

सध्याच्या क्रमवारीमध्ये 118 पॉईंट्ससह ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडकडे 113 आणि भारताकडे 112 पॉईंट्स आहेत. वनडे बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये डेव्हि़ड वॉर्नर पहिल्या तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली वगळता भारताचा एकही बॅट्समन टॉप 10मध्ये नाही.

बॉलरच्या क्रमवारीमध्ये भारताचा एकही बॉलर टॉप 10मध्ये नाही. या क्रमवारीमध्ये अक्षर पटेल बाराव्या आणि अमित मिश्रा 14व्या क्रमांकावर आहे.