नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर येण्याआधीच ऑस्ट्रेलिया संघाच्या समस्या वाढल्यात. दरम्यान, या दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ चांगलीच मेहनत घेतोय.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माचे पुनरागमन होऊ शकते.
गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर होता. मात्र आता तो संघात पुनरागमन करण्याची शक्यताय. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, वनडे आणि टी-20 मालिकेत रोहित खेळला नव्हता.
गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम वनडे सामन्यातील दुखापतीनंतर मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पुनरागमनाबाबत बोलताना रोहित म्हणाला, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करण्याचा मी प्रयत्न करतोय. सध्या मी राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीत आहे आणि येथे प्रत्येकजण मला मदत करतोय.