टीम इंडिया हरली तरीही...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा 4-1नं दारुण पराभव झाला.  सिडनीमध्ये विजय मिळवत टीम इंडियानं लाज राखायचा प्रयत्न केला.

Updated: Jan 23, 2016, 06:28 PM IST
टीम इंडिया हरली तरीही... title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा 4-1नं दारुण पराभव झाला.  सिडनीमध्ये विजय मिळवत टीम इंडियानं लाज राखायचा प्रयत्न केला. ही सीरिज टीम इंडियानं गमावली असली तरी, मॅन ऑफ द सिरीज आणि सिडनी वनडेचा मॅन ऑफ द मॅचचा किताब टीम इंडियानं कमावलाय.

सिडनीमधल्या वनडेमध्ये सेंच्युरी झळकावून विजय मिळवून देणारा मनिष पांडे मॅन ऑफ द मॅच ठरला, तर मॅन ऑफ द सीरिजचा किताब रोहित शर्माला मिळालाय. रोहित शर्मानं 5 वनडेच्या या सीरिजमध्ये 441 रन्स केल्या. ज्यात पहिल्या दोन्ही वनडेमध्ये त्यानं सेंच्युरी लगावली. तर शेवटच्या वनडेमध्ये रोहितची सेंच्युरी फक्त 1 रननं हुकली. याच मॅचमध्ये रोहितनं आपल्या वनडे कारकिर्दित 5 हजार रन्स पूर्ण केल्यात. 

तर विराट कोहलीही या सीरिजमध्ये चमकला. 5 मॅचमध्ये विराट कोहलीनं दोन सेंच्युरी तर दोन हाफ सेंच्युरी झळकावल्या. रोहित आणि विराटनं या सीरिजमध्ये चमकदार कामगिरी केली, पण भारतीय बॉलर्सनं त्यांना चांगली साथ दिली असती तर फक्त शेवटच नाही, तर सगळंच गोड झालं असतं.