सानिया मिर्झाचा 'दुहेरी' विजय

ऑस्ट्रेलियन ओपन सामन्यात भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झासाठी आजचा दिवस विजयाचा ठरला. सानियाने महिला दुहेरी स्पर्धेत विजय मिळवला. 

Updated: Jan 23, 2016, 06:25 PM IST
सानिया मिर्झाचा 'दुहेरी' विजय title=

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन सामन्यात भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झासाठी आजचा दिवस विजयाचा ठरला. सानियाने महिला दुहेरी स्पर्धेत विजय मिळवला. 

सानिया आणि मार्टिना हिंगीस या जोडीने युक्रेनच्या ल्युडम्लिया आणि नदाईया किचोनोक या बहिणींचा ६-२, ६-३ ने पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

सानिया-मार्टिन यांचा पुढील सामना आता रशिया आणि इटलीच्या स्वेटलाना कुझनेस्तोवा आणि रोबर्टा विनसी यांच्याशी होणार आहे.

दुहेरी स्पर्धेत सानियाने क्रोटियनच्या ल्वान डॉडिंगसोबत अज्ला टॉम्जानोविक आणि निक क्रारजिवन या जोडीचा पराभव केला. सानिया-ल्वानने ७-५ आणि ६-१ ने विजय मिळवला.