कुमार संगकारा सचिनचे रेकॉर्ड तोडण्यास सज्ज

श्रीलंकेचा वर्ल्ड कपमधील मॅन इन फॉर्म बॅट्समन कुमार संगकारा सध्या विविध रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याने सलग चार मॅचमध्ये सेंच्युरीज ठोकून नवा रेकॉर्ड केला आहे. त्याच्या या खेळाच्या जोरावर  श्रीलंका वर्ल्ड कपच्या क्वार्टर फाइनलमध्ये पोहचली आहे. 

Updated: Mar 17, 2015, 01:30 PM IST
कुमार संगकारा सचिनचे रेकॉर्ड तोडण्यास सज्ज title=

मुंबई : श्रीलंकेचा वर्ल्ड कपमधील मॅन इन फॉर्म बॅट्समन कुमार संगकारा सध्या विविध रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याने सलग चार मॅचमध्ये सेंच्युरीज ठोकून नवा रेकॉर्ड केला आहे. त्याच्या या खेळाच्या जोरावर  श्रीलंका वर्ल्ड कपच्या क्वार्टर फाइनलमध्ये पोहचली आहे. 

वर्ल्ड कपमध्ये विविध रेकॉर्ड आपल्या नावे करणारा संगकारा आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तोडण्यास तयार आहे. एकाच वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त रन्स आणि वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त सेंच्युरी सध्या सचिनच्या नावावर आहेत. मात्र संगकारा ज्या सुसाट वेगानं पुढं जात आहे ते पाहता त्याच्याकडून सचिनचे रेकॉर्ड सहज तुटण्याची शक्यता आहे.

सचिन २००३ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये ११ सामने खेळला होता. त्यात त्यानं ६७३ रन्स केले होते. मात्र ह्या वर्ल्ड कपमध्ये कुमार संगकाराने ६ सामन्यांमध्ये ४९६ रन्स ठोकल्या आहेत. त्यात चार सेंच्युरींचा समावेश आहे. सचिननं वर्ल्ड कपमध्ये  दोनवेळा ५०० पेक्षा जास्त रन्स केले आहेत.  सचिनने २००३ मध्ये ६७३, तर १९९६ च्या वर्ल्ड कपमध्ये ५२३ रन्स केले होते आणि असं करणारा तो एकमेव खेळाडू आहे.