अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या रवी शास्त्रीविरोधात तक्रार

दक्षिण आफ्रिकेने वानखेडेवर धावांचा डोंगर रचल्यानंतर वानखेडे स्टेडिअमच्या क्युरेटर सुधीर नाईक यांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या भारतीय संघाचे मॅनेजर रवी शास्त्री यांच्याविरोधात लेखी तक्रार नाईक यांनी दाखल केली आहे. 

Updated: Oct 27, 2015, 02:37 PM IST
अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या रवी शास्त्रीविरोधात तक्रार  title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेने वानखेडेवर धावांचा डोंगर रचल्यानंतर वानखेडे स्टेडिअमच्या क्युरेटर सुधीर नाईक यांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या भारतीय संघाचे मॅनेजर रवी शास्त्री यांच्याविरोधात लेखी तक्रार नाईक यांनी दाखल केली आहे. 

खेळपट्टी तयार करणारे कर्मचारी आणि क्युरेटर सुधीर नाईक यांच्यावर आगपाखड केली. संघाचे क्रिकेट डायरेक्टर रवी शास्त्री यांनी सुधीर नाईक यांना ड्रेसिंग रूमबाहेरील गॅलरीत येऊन अर्वाच्य भाषेत लाखोली वाहिली.

अधिक वाचा : टीम इंडियाच्या दारूण पराभवानंतर पिच क्यूरेटरवर भडकले रवी शास्त्री 

क्युरेटर सुधीर नाईक यांनी त्या वेळी घडलेला प्रसंग बीसीसीआयचे क्रिकेट व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांना सांगितला.
 

आणखी वाचा - टीम इंडियाचा २१४ रन्सने लाजीरवाणा पराभव

सुधीर नाईक यांनी या प्रकाराबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनलाही लेखी निवेदन दिल्याचे कळते. मुंबई क्रिकेट असोसिएशन ही घटना बीसीसीआयला कळवणार आहे. शनिवारी सामन्याच्या आधीही रवी शास्त्री आणि कर्णधार धोनी यांनी खेळपट्टीवर गुडलेंग्थ स्पॉटवर पाणी मारण्यास सांगितले होते, अशीही आता चर्चा आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.