'खेलो दिल से, वर्ल्ड कप लाओ फिर से', मोदींच्या टीम इंडियाला शुभेच्छा!

ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचं आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाला वर्ल्डकपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला त्यांनी वेगवेगळ्या शुभेच्छा दिल्यायेत.

Updated: Feb 12, 2015, 09:28 PM IST
'खेलो दिल से, वर्ल्ड कप लाओ फिर से', मोदींच्या टीम इंडियाला शुभेच्छा! title=

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचं आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाला वर्ल्डकपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला त्यांनी वेगवेगळ्या शुभेच्छा दिल्यायेत.

मोदींनी खेळाडूंमध्ये उत्साह भरण्यासाठी ट्वीट केलेय, 'क्रिकेट वर्ल्डकप २०१५ची सुरूवात झालीय. टीम इंडियाला माझ्या शुभेच्छा. मनापासून खेळा आणि पुन्हा वर्ल्डकप घेऊन या!'

पंतप्रधानांनी फक्त टीम इंडियाला नाही तर त्यांच्या सदस्यांना वेगवेगळ्या शुभेच्छा दिल्या.

धोनीला शुभेच्छा!

कॅप्टन महेंद्र सिंह धोनीला शुभेच्छा देत पीएमनी ट्वीट केलं,"कॅप्टन कूल धोनीला माझ्या शुभेच्छा, दमदार खेळा, चांगलं नेतृत्व दे आणि भारताची मान उंचवा. मला माहितीय आपल्यात ती शक्ती आहे."

कोहलीकडून अपेक्षा!

मोदींनी कोहलीलाही शुभेच्छा देत लिहिलं, "वर्ल्डकपसाठी तुफानी उप-कॅप्टन विराट कोहलीला आमच्या शुभेच्छा. संपूर्ण देशला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत."

शिखरसाठी सल्ला...

मोदींनी आपल्या पुढील शुभेच्छांमध्ये सांगितलं, "शिखर धवन भारताची चांगली सुरूवात आहे. प्रत्येक वेळी आपण पुढे सरकलात. खूप रन्स बनवले. आम्ही सर्व चिअर करण्यासाठी तयार बसलोय."

रोहितची शान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोहित शर्मासाठी लिहिलं, "रोहित आपण असे एकटे खेळाडू आहात. ज्यांनी वनडेमध्ये दोन वेळा डबल सेंच्युरी केलीय. आपण लाखो लोकांचे चाहते आहात. आम्हा सर्वांना पुन्हा एकदा अभिमान करण्याची संधी द्या."

यासोबतच मोदींनी टीमच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि पुन्हा वर्ल्ड कप जिंकण्याचा नवा नारा दिलाय. 'खेलो दिल से, वर्ल्ड कप लाओ फिर से!'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.