Pune BPO Murder Case: विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली. पुण्यातील येरवडा परिसरातील बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजेच बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या 28 वर्षीय तरुणीवर तिच्या सहकाऱ्याने हल्ला केला. भर उजेडात सर्वांसमोर स्वयंपाकघरातील चाकूने तिच्यावर निर्घृणपणे वार करण्यात आले. हा घृणास्पद हल्ला ऑफिसच्या पार्किंगमध्ये डझनभर लोकांच्या उपस्थितीत झाला. परंतु मुलीला वाचवण्यासाठी कोणीही हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेचा व्हिडीओ आता समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होतोय.
तरुणीवर हल्ला होत असताना सर्वजण उभे राहून पाहत होते. पीडित तिच्या वडिलांच्या आजाराबद्दल खोटे बोलून हल्लेखोराकडून अनेक वेळा पैसे उधार घेतले होते. पण जेव्हा ते परत करण्यास सांगितले तेव्हा तिने नकार दिला. या विश्वासघातामुळे संतप्त होऊन त्याने असे घृणास्पद पाऊल उचलल्याचे सांगितलं जातंय. पुणे पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. जखमी अवस्थेत मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. पण दुर्देवाने तिचा मृत्यू झाला.
ही चीड आणणारी घटना दोन मंगळवारी, ७ जानेवारी रोजी येरवडा येथील डब्ल्यूएनएस ग्लोबल कंपनीच्या आवारात घडली. 30 वर्षीय आरोपी कृष्णा कन्नौजा याला ताब्यात घेण्यात आले आहे. कृष्णा संबंधित कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतो. पुणे पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. मृत शुभदा कोद्रे तिचे वडील आजारी असल्याचे सांगायची. वडिलांवर उपचार करण्याच्या नावाखाली तिने माझ्याकडून अनेक वेळा पैसे उधार घेतले होते. जेव्हा मी तिला कर्ज परत करण्यास सांगितले तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिला. यामुळे आमच्यात वाद झाला, अशी माहिती आरोपी कृष्णा याने पोलिसांना दिली.
#पुणे
एवढ्या लोकांमध्ये शुभदा शंकर पोतेरे (वय २८) हिचा कृष्णा कनोजा (वय ३०) याने कोयत्याने वार करून खून केला. याला रोखण्याची एकाचीही हिंमत झाली नाही.
लोक कोयत्याला घाबरतात
पण तरीही तिला वाचवता आले असते.#pune#punenews pic.twitter.com/NNLJr5pgyk— Brijmohan Patil (@brizpatil) January 9, 2025
जेव्हा कृष्णा शुभदाच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तिच्या घरी गेला तेव्हा ती खोटं बोलत असल्याचे त्याच्या लक्षात आले. कारण तिचे वडील निरोगी होते. यानंतर शुभदाने पैसे परत करण्यास नकार दिल्यानंतर कृष्णाला खूप राग आला. यामुळे त्याला आपली फसवणूक झाल्यासारखे वाटल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता ऑफिसच्या पार्किंगमध्ये कृष्णाने शुभदा कोद्रेला थांबवले. तुझे खोटे उघडे पडले असून आता माझे पैसे परत दे असे तो म्हणाला. यावर शुभदा त्याच्याशी वाद घालू लागली. दोघांमधील वाद इतका वाढला की रागाच्या भरात कृष्णाने तिच्यावर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला केला. रागाच्या भरात त्याने शुभदावर एकामागून एक अनेक वार केले.
जेव्हा कृष्णाने शुभदावर चाकूने वार केले तेव्हा पार्किंगमध्ये डझनभर लोक उभे होते. पण त्याला थांबवण्याची हिंमत कोणातही नव्हती. यादरम्यान काही लोक ही संपूर्ण घटना त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत राहिले. जेव्हा शुभदा जमिनीवर पडली आणि कृष्णाने चाकू बाजूला फेकला. यानंतर जमाव उत्तेजित झाला आणि त्यांनी कृष्णाला पकडून बेदम मारहाण केली. दरम्यान शुभदाला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. कृष्णाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. काही लोकांनी या भयानक हत्याकांडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला, जो आता खूप व्हायरल होतोय. पण शुभदाचा जीव वाचू शकला नाही.