मुंबई: टीम इंडियाच्या वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर केलाय. मुलीसोबत जास्तीतजास्त वेळ तो घालवतोय. धोनी नेहमीच मुलगी झिवाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो आणि फोटोद्वारे आपल्या चाहत्यांना मुलीला भेटवतो.
यापूर्वी आयपीएल मॅचदरम्यान धोनी आणि त्याची पत्नी साक्षीसोबत झिवा दिसली होती. धोनी जेव्हा वर्ल्डकपच्या टूरवर ऑस्ट्रेलियात होता. तेव्हा त्याच्या पत्नीनं साक्षीनं फेब्रुवारी २०१५मध्ये झिवाचा जन्म झाला होता. नंतर धोनीनं आपल्या एका वक्तव्यात म्हटलं, झिवाच्या जन्मानंतर त्याचं आयुष्यच बदलून गेलं.
धोनी मुलीच्या जन्मावेळी वर्ल्डकपमध्ये खेळत होता. त्यामुळं मुलीच्या जन्मानंतर तो तिला बघायला पण येऊ शकला नाही. धोनीनं जवळपास २ महिन्यांनंतर आपल्या परीला पहिल्यांदा पाहिलं. आता धोनी जिथं जातो तिथं आपल्या मुलीला सोबत घेऊन जातो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.