अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा आमिर खान? आरोप करताच म्हणाला, 'मी ज्यांच्या हातावर थुंकलो त्या...'

Aamir Khan : आमिर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात झाली.

दिक्षा पाटील | Updated: Nov 25, 2024, 02:06 PM IST
अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा आमिर खान? आरोप करताच म्हणाला, 'मी ज्यांच्या हातावर थुंकलो त्या...' title=
(Photo Credit : Social Media)

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हटले जाणारे आमिर खाननं आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशात देखील आहेत. इंडस्ट्रीमध्ये त्यानं अनके टॉपच्या अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. पण तुम्हाला माहितीये का की आमिर खान हा त्याच्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकतो त्यानं याविषयी खुलासा केला होता. त्याचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

आमिर खाननं आजवर बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली आहे. त्यात जूही चावला, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, काजोलसारख्या लोकप्रिय अभिनेत्रींसोबत तो दिसला. त्यांच्यासोबत त्यानं अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आता आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर' वरून तो चर्चेत असताना त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत तो या मागचं कारण सांगताना दिसतोय. 

Aamir Khan spits on heroines hands to make the number 1 . Did it on Juhi too.
byu/bhasadkweeen inBollyBlindsNGossip

फराह खान यावेळी आमिर सेटवर कशी मस्ती करतो याविषयी सांगताना दिसते. त्यावेळी ती म्हणाली की हा अभिनेत्रींना हात दाखवण्यास सांगतो आणि मग त्यानंतर त्यांच्या हातावर थुंकतो. त्यावेळी त्याच्या समोर त्याच्या 'दंगल' या चित्रपटातील सहकलाकार सना शेख आणि सान्या मल्होत्रा देखील उपस्थित होत्या. तर त्यांनी देखील हे मान्य केलं. राजीवर मसंद म्हणाले, आमिर नेहमीच असं करतात आणि अजूनही करतोय. तो नेहमी बोलतो की तुमचा हात दाखवा आणि मग त्यावर थुंकतो. 

या मागचं कारण सांगत आमिर खान म्हणतो की मी माझ्या अभिनेत्रींच्या हातावर का थुंकतो? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मी ज्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकलोय त्या सगळ्या स्टार झाल्या आहेत. आमिरनं फातिमा आणि सान्याच्या हातावर थुंकल्याचं मान्य केलं. 

हेही वाचा : गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या तयारीत असलेल्या नागा चैतन्यवर समांथाचा निशाणा; म्हणाली, 'माझ्या Ex वर मी भरपूर...'

दरम्यान, या लॉजिकवरुन नेटकऱ्यांनी आमिरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, सेलिब्रिटींनी काही केलं तरी सगळ्यांना ती फक्त मस्करी वाटते. दुसरा नेटकरी म्हणाला, हे काय लॉजिक आहे? मस्करी म्हणून देखील हे ठीक नाही. हे तर राग येण्यासारखं आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, त्यानं कधी विचार केलाय का की त्या अभिनेत्रीला किती राग येत असेल? आणखी एक नेटकरी म्हणाला, 'जुही चावलानं त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं आणि माधुरी दीक्षित तर त्याच्या मागे बांबू घेऊन धावत होती.'