महिला टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-०ने जिंकली

सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना भारतीय महिला क्रिकेट टीमने शुक्रवारी इतिहास रचला. तीन सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरी टी-२० जिंकत भारतीय संघाने २-० असा मालिका विजय मिळवलाय. तसेच ऑस्ट्रेलियातील भारतीय संघाचा हा पहिला मालिका विजय आहे. 

Updated: Jan 29, 2016, 12:53 PM IST
महिला टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-०ने जिंकली title=

मेलबर्न : सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना भारतीय महिला क्रिकेट टीमने शुक्रवारी इतिहास रचला. तीन सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरी टी-२० जिंकत भारतीय संघाने २-० असा मालिका विजय मिळवलाय. तसेच ऑस्ट्रेलियातील भारतीय संघाचा हा पहिला मालिका विजय आहे. 

पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशिरा सुरु झाल्याने १८ षटकांचा खेळवण्यात आला. यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. १८ षटकांत ऑस्ट्रेलियाने आठ गड्यांच्या मोबदल्यात १२५ धावा केल्या आणि भारतासमोर १२६ धावांचे सोपे आव्हान ठेवले. 

या दरम्यान सामन्यात पुन्हा एकदा पावसाचा व्यत्यय आला. यामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला १० षटकांत ६६ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. महिला टीमने हे आव्हान ९.१ षटकांत पूर्ण केले आणि विजयासह मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले. याच मैदानावर थोड्याच वेळात भारत आणि ऑस्ट्रेलिया पुरुष टीममध्ये दुसरा टी-२० सामना रंगणार आहे.