कोहलीने माझ्याशी असे वर्तन करायला नको होते - स्मिथ

 अॅडलेडवर झालेल्या पहिल्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहलीने असे हाव-भाव नको करायला होते असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने म्हटलंय.

Updated: Jan 29, 2016, 11:18 AM IST
कोहलीने माझ्याशी असे वर्तन करायला नको होते - स्मिथ title=

मेलबर्न : अॅडलेडवर झालेल्या पहिल्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहलीने असे हाव-भाव नको करायला होते असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने म्हटलंय.

कोहली मैदानावर खूप भावूक होतो. एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर कोणीही असे वर्तन करु नये. मैदानावर थोडी मस्करी चालते. मात्र माझ्या मते असे वर्तन कोणी बाद झाल्यावर करु नये, असे स्मिथ म्हणाला. 

पुढच्या वेळेस अशी चूक करणार नाही

कमेंटेटरशी बातचीत केल्याने नव्हे तर चुकीचा शॉट खेळायला गेलो म्हणून बाद झाल्याची कबुली कर्णधार स्मिथने दिलीय. त्यावेळी चुकीचा कॉमेंट्री होत होती मात्र चुकीचा शॉट खेळल्याने मी बाद झालो. चौकार अथवा षटकार मारण्याऐवजी दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढच्या वेळेस अशी चूक करणार नाही.