विम्बल्डनच्या आयोजकांचं सचिनला निमंत्रण

 मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या इंग्लंडमध्ये असून त्यानं आज वर्ल्ड नंबर वन राफाएल नदाल आणि मिखाईल कुकुशकिनच्या मॅचचा आनंद घेतला. विम्बल्डनच्या आयोजकांनी सचिनसह अनेक दिग्गज प्लेअर्सना मॅचेच पाहण्यासाठी आमंत्रित केल होतं. 

AP | Updated: Jun 28, 2014, 10:44 PM IST
विम्बल्डनच्या आयोजकांचं सचिनला निमंत्रण title=

लंडन : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या इंग्लंडमध्ये असून त्यानं आज वर्ल्ड नंबर वन राफाएल नदाल आणि मिखाईल कुकुशकिनच्या मॅचचा आनंद घेतला. विम्बल्डनच्या आयोजकांनी सचिनसह अनेक दिग्गज प्लेअर्सना मॅचेच पाहण्यासाठी आमंत्रित केल होतं. 

सचिननं सेंटर कोर्टच्या रॉयल बॉक्समध्ये बसून नदालच्या मॅचचा आनंद लुटला. ब्लू सूट आणि स्काय ब्लू टाय घातलेला सचिन इंग्लंडचा माजी कॅप्टन एँड्रयू स्ट्रॉस आणि इंग्लंडचा माजी फुटबॉल कॅप्टन डेविड बॅकहमसह रॉयल बॉक्समध्ये बसला होता. सचिनची पत्नी अंजली तेंडुलकरही यावेळी उपस्थित होती.

वर्ल्ड कप विनर सर बॉकी चार्लटन, इंग्लंडचा रग्बी कॅप्टन ख्रिस रॉबशॉ, क्रिकेटपटू स्टुअर्ड ब्रॉड आणि स्टिवन फिनसह जगभरातील अनेक दिग्गज देखील ही मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.