चेन्नईमध्ये भारताची विक्रमी धावसंख्या

चेन्नईच्या मैदानावर भारतीय संघाने भारतीय कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. भारताने या सामन्यात सात बाद 755 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

Updated: Dec 19, 2016, 05:00 PM IST
चेन्नईमध्ये भारताची विक्रमी धावसंख्या title=

चेन्नई : चेन्नईच्या मैदानावर भारतीय संघाने भारतीय कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. भारताने या सामन्यात सात बाद 759 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

याआधी 2009मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना भारताने 9 बाद 726 धावा केल्या होत्या. त्यानंतर तब्बल 7 वर्षांनी भारताला इतकी मोठी धावसंख्या उभारता आलीये. 

भारताच्या आजच्या खेळीत करुण नायरने सर्वाधिक 303 धावा केल्या. तर लोकेश राहुलने 199 धावा केल्या. करुण नायर सेहवागनंतर त्रिशतक कऱणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरलाय. 

यापूर्वी भारताचा कसोटीमध्ये सर्वाधिक स्कोर

श्रीलंकेविरुद्ध 2009मध्ये भारताचा स्कोर 726 -9 घोषित(मुंबई)
श्रीलंकेविरुद्ध 2010मध्ये भारताचा स्कोर 707(कोलंबो)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2004मध्ये भारताचा स्कोर 705-7 घोषित(सिडनी)
श्रीलंकेविरुद्ध 1986मध्ये भारताचा स्कोर 676(कानपूर)
पाकिस्तानविरुद्ध 2004मध्ये भारताचा स्कोर 675-5 घोषित (मुल्तान)