क्रिकेटच्या माहेरी २७२ वर्षे जुनी परंपरा आऊट

लंडन : क्रिकेटमध्ये सामन्यापूर्वी उडवला जाणारी टॉसची पद्धत इंग्लंडमध्ये बंद करण्यात आलीये.

Updated: Mar 14, 2016, 12:35 PM IST
क्रिकेटच्या माहेरी २७२ वर्षे जुनी परंपरा आऊट title=

लंडन : क्रिकेटमध्ये सामन्यापूर्वी उडवला जाणारी टॉसची पद्धत इंग्लंडमध्ये बंद करण्यात आलीये. इंग्लिश आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या काऊंटी क्रिकेट सामन्यात ही प्रथा संपवण्यात आली आहे. २७२ वर्षांपासून टॉस उडवण्याची पद्धत सुरु आहे. 

जर टॉस केला नाही तर कोणता संघ पहिली फलंदाजी किंवा गोलंदाजी करणार असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. याचं उत्तर सोपं आहे. जो पाहुणा संघ असतो त्याला पहिल्यांदा गोलंदाजी करण्याची संधी मिळते. ही संधी त्यांनी नाकारली तर मात्र मग टॉस केला जातो.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने गेल्या वर्षी पहिल्यांदा हा निर्णय घेतला. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांना उत्तेजन मिळावे म्हणून हा निर्णय घेतला गेल्याचे समजले आहे. क्रिकेटच्या खेळात पिचला महत्त्व असते. यजमान संघाला मात्र आपल्या हिशोबाने हे पिच तयार करण्याचा अधिकार प्रथम फलंदाजी केल्यामुळे मिळतो.