महेंद्रसिंग धोनीला आदर्श मानतो हा पाकिस्तानी खेळाडू

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आज यशस्वी कर्णधारांच्या पंक्तीत आहे. क्रिकेट चाहते तर त्याचे दिवाने तर आहेतच पण काही खेळाडू देखील धोनीला आदर्श मानतात.

Updated: Mar 14, 2016, 11:50 AM IST
महेंद्रसिंग धोनीला आदर्श मानतो हा पाकिस्तानी खेळाडू title=

मुंबई : भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आज यशस्वी कर्णधारांच्या पंक्तीत आहे. क्रिकेट चाहते तर त्याचे दिवाने तर आहेतच पण काही खेळाडू देखील धोनीला आदर्श मानतात.

पाकिस्तानचा विकेटकिपर हा देखील या खेळाडूंमधलाच एक आहे. सरफराज अहमद याने रविवारी म्हटलं की तो महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानतो. तो धोनी सारखा फिनिशर बनू इच्छितो.

धोनी हा विकेटकिपिंग आणि बॅटींग धोनी उत्तम करतो. मी धोनीला पुजतो. ज्याप्रकारे तो खेळतो मला ही पाकिस्तानसाठी तसंच खेळायचं आहे. असं देखील सरफराज याने म्हटलं आहे.

१९ मार्चला कोलकात्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. सरफराज म्हणतो की, 'दोन्ही टीमवर समान दबाव असेल. हा खूप मोठा सामना आहे. चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न असेल.'