धोनीने केला नवा रेकॉर्ड

 भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आजच्या सामन्यात कर्णधारपद भूषवून वन डेमध्ये भारताकडून सर्वाधिक सामन्यात कर्णधारपद भूषविण्याचा नवा रेकॉर्ड केला आहे. 

Updated: Mar 10, 2015, 01:54 PM IST
 धोनीने केला नवा रेकॉर्ड title=

हॅमिल्टन :  भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आजच्या सामन्यात कर्णधारपद भूषवून वन डेमध्ये भारताकडून सर्वाधिक सामन्यात कर्णधारपद भूषविण्याचा नवा रेकॉर्ड केला आहे. 

आजच्या सामन्यानंतर त्याने मोहम्मद अझरुद्दीन याचा रेकॉर्ड धोनीने मोडला आहे. कर्णधार म्हणून धोनीचा हा १७५ वा सामना होता. अझरुद्दीने याने भारताकडून १७४ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. या सामन्यापूर्वी धोनीने १७४ पैकी ९७ सामने जिंकले तर ६२ सामने गमावले आहेत. तर त्यातील चार सामने बरोबरीत सुटले असून ११ सामने अनिर्णित राहिले आहेत. 

भारताकडून सर्वाधिक वन डे सामन्यात कर्णधारपद भूषविणाऱ्या खेळाडूंची यादी पुढील प्रमाणे 

महेंद्रसिंग धोनी - १७५ 
अझरुद्दीन - १७४ 
सौरव गांगुली - १४६
राहुल द्रविड - ७९
कपिल देव - ७४
सचिन तेंडुलकर - ७३ 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वन डेमध्ये सर्वाधिक सामन्यात कर्णधारपद ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंग यांच्या नावावर आहे. त्याने २३० सामन्यात कर्णधारपद भूषविले आहे. त्यानंतर स्टिफन फ्लेमिंग (२१८), अर्जुन रणतुंग (१९३), अॅलन बॉर्डर (१७८) यांचा क्रमांक लागतो. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.