विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, सचिनचा रेकॉर्डही तोडला

क्रिकेट वर्ल्डकपच्या भारताच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीनं सेंच्युरी ठोकून एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. त्यानं लगातार दुसऱ्या वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड बनवलाय. सोबतच पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये सेंच्युरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.

Updated: Feb 15, 2015, 03:32 PM IST
विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, सचिनचा रेकॉर्डही तोडला title=

अॅडलेड: क्रिकेट वर्ल्डकपच्या भारताच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीनं सेंच्युरी ठोकून एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. त्यानं लगातार दुसऱ्या वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड बनवलाय. सोबतच पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये सेंच्युरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.

विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा १२ वर्ष जुना रेकॉर्ड तोडलाय. सचिन तेंडुलकरनं २००३च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्ध ९८ रन्स बनवले होते. 

विराट कोहली त्याचा दुसरा वर्ल्डकप खेळतोय आणि पहिल्याच मॅचमध्ये सेंच्युरी ठोकून त्यानं आणखी एक रेकॉर्ड बनवलाय. कोहली दुसऱ्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या पहिल्या मॅचमध्ये सेंच्युरी करणारा पहिला खेळाडू ठरलाय. एवढंच नव्हे तर कोहलीनं आपल्या डेब्यु मॅचमध्ये सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड बनवला होता. २०११मध्ये वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये कोहलीनं नॉटआऊट १०० रन्स केले होते.  वर्ल्डकपमध्ये आपली १० वी मॅच खेळणाऱ्या कोहलीची ही दुसरी सेंच्युरी आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.