राज ठाकरेंनी दिला गुजरातींना सल्ला

`महाराष्ट्र दिनी तरी गुजराती समाजाने बॉम्बे नाही मुंबई म्हणा आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरातींनी स्वत:ला आधी मराठी समजावं,` असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गुजराती समाजाला त्यांच्याच कार्यक्रमात दिला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 2, 2013, 01:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`महाराष्ट्र दिनी तरी गुजराती समाजाने बॉम्बे नाही मुंबई म्हणा आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरातींनी स्वत:ला आधी मराठी समजावं,` असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गुजराती समाजाला त्यांच्याच कार्यक्रमात दिला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विलेपार्ल्यातल्या जैन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते.
इतर वेळेस तुम्ही काय म्हणत असाल हे मला माहीत नाही पण, महाराष्ट्र दिनी तरी तुम्ही सर्वांनी बॉम्बेला मुंबई म्हटलं तर मला आनंद होईल, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.
गुजरातमध्ये विशेषतः बडोद्यात मोठ्या प्रमाणात मराठी माणसे आहे. ते स्वतःला मराठी नाही तर गुजराती समजतात. तुम्ही गुजराती असला तरी मुंबई राहताना स्वतःला मराठी समजा, मुंबईकर समजा, असा सल्ला राज यांनी दिला.
नेहमी उत्तर भारतीयांविरोधात जहाल असणारे राज ठाकरे गुजराती समाजाविषयी समभाव ठेवतात. मोदी आणि राज यांची दोस्तीही जगाला माहिती आहे. मुंबईत गुजराती समाजाची संख्या मोठी आहे आणि ही मतं आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकतात याची राज यांना चांगली कल्पना आहे.
त्यामुळे एकीकडे गुजराती मतांवर नजर ठेऊन राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याची चर्चा होती.