पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत आता चांगली आहे, असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये त्यांना डिस्चार्ज मिळेल,
असंही या ट्विटमध्ये सांगण्यात आलंय.
रविवारी संध्याकाळी पवारांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मूत्रपिडाच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यानं त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. रुबी हॉस्पीटलच्या डॉक्टरांचं विशेष पथक पवारांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.