शनि शिंगणापूर : शनि शिंगणापूर इथं चौथऱ्यावर जाऊन पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील दर्शन घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत भूमाता ब्रिगेडच्या महिला २६ जानेवारी रोजी शनि शिंगणापूर येथे शनि चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेणार आहेत.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षा विभागाने मंदिर परिसरात बंदोबस्त वाढवलाय.. यांत 15 महिला सुरक्षा कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली असून सुरक्षा रक्षकांची संख्या 168 करण्यात आलीय..
दुसरीकडे २६ जानेवारीला शनि शिंगणापूर येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असून योग्य तो पोलिस बंदोबस्त तैनात करणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केलंय.