www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागानं खाद्यतेलाचा कृत्रिम साठा करणा-या नऊ तेल टॅँकरवर कारवाई केली आहे. १ कोटी २० लाख रुपये किंमतीचे हे खाद्यतेल असून दिवाळीसाठी या खाद्य तेलाचा कृत्रिम साठा केला असण्याची शक्यता पुरवठा विभागानं व्यक्त केलीय.
कोल्हापूर शहराजवळील पुणे-बंगळुरू महामार्गावरील कोंडूसकर पेट्रोल पंपाजवळ हे नऊ खाद्यतेलाचे टँकर गेल्या चार दिवासांपासून उभे होते. याबाबत कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागाला माहिती मिळाली. त्यानंतर पुरवठा विभागानं ही कारवाई केली आहे.
हे तेल मुंबई, हैद्रराबाद इथून आणल्याचं तपासात उघडकीस आलंय. हे खाद्य तेल खुलं असल्यानं त्यामध्ये भेसळ केली आहे का? याबाबतही तपास केला जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.