क्वार्टर फायनलमध्ये भारतासमोर तीन धोके

ग्रुप A मध्ये बांगलादेशने इंग्लंडला पराभूत केले आणि वर्ल्ड कप क्वार्टर फाइनलमध्ये भारत विरूद्ध बांगलादेश असा सामना रंगणार हे निश्चित झाले. शेवटच्या मॅचमध्ये बांगलादेशला न्यूझीलंडने पराभूत केले असले तरी ज्याप्रकारे बांगलादेश खेळत आहे त्यानुसार भारताने सावधगिरी बाळगली पाहिजे. बांगलादेशकडुन भारताला कडवे आव्हान मिळू शकते.

Updated: Mar 16, 2015, 03:12 PM IST

मुंबई : ग्रुप A मध्ये बांगलादेशने इंग्लंडला पराभूत केले आणि वर्ल्ड कप क्वार्टर फाइनलमध्ये भारत विरूद्ध बांगलादेश असा सामना रंगणार हे निश्चित झाले. शेवटच्या मॅचमध्ये बांगलादेशला न्यूझीलंडने पराभूत केले असले तरी ज्याप्रकारे बांगलादेश खेळत आहे त्यानुसार भारताने सावधगिरी बाळगली पाहिजे. बांगलादेशकडुन भारताला कडवे आव्हान मिळू शकते.

बांगलादेशचे असे काही खेळाडू आहेत जे भारताला धोकादायक ठरू शकतात. पाहूया कोणते 
आहेत ते खेळाडू...
 
मोहम्मद महमुदुल्लाह रियाद-
महमुदुल्लाहने वर्ल्ड कप 2015 आतापर्यंत 5 मॅचमध्ये 86 च्या सरासरीने 344 रन बनवले आहेत. त्याने इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन शतकं ठोकली आहेत. असं करणारा तो बांगलादेशाचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचा हा फॉर्म भारताला धोकादायक ठरू शकतो.

शाकीब अल हसन-
बांगलादेशचा सर्वात अनुभवी खेळाडू शाकीब अल हसनने वर्ल्ड कप 2015 आतापर्यंत 5 मॅचमध्ये 186 रन आणि 7 विकेटही घेतल्या आहेत. शाकीब आयपीएलमध्ये खेळत असल्याने भारतीय बॅट्समन्सचीही बरीच माहिती त्याला आहे. त्याचा फॉर्मही भारताला धोकादायक ठरू शकतो.

रूबेल हुसैन-
रूबेल हुसैनने वर्ड कप 2015 आतापर्यंत 5 मॅचमध्ये 5.97 इकोनॉमीने 7 विकेट घेतल्या आहेत. रूबेलने इंग्लड विरूद्धच्या सामन्यात ४ विकेट घेऊन विजयात मोलाचा वाटा उचलला होता. रूबेल बांगलादेशचा यशस्वी बॉलर आहे. तोही सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे.

वरील खेळाडूंचे आकडे पाहता हे खेळाडू भारताला कधीही धक्का देऊ शकतात. वर्ल्ड कप 2007 मध्ये बांगलादेशने भारताला पराभूत करून पहिल्याच फेरीतून भारताला घरचा रस्ता दाखवला होता. त्यामळे बांगलादेशला कमी समजण्याची चूक भारत करणार नाही.

भारत विरूद्ध बांगलादेश क्वार्टर फाइनल मॅच 19 मार्चला मेलबर्नमध्ये होणार आहे.