सिडनी : एक विचित्र बाब समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नदीम आलम नावाचा हा बनावट क्रिकेट समीक्षक, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर नदीम अब्बासीच्या नावाने, बीबीसी चॅनलवर क्रिकेट एक्सपर्टच्या चर्चेत सहभाग घेत होता. जेव्हा त्याची ही करामत पकडली गेली, तेव्हा बीबीसीलाही धक्का बसला.
नदीम अब्बासी बनून फिरणाऱ्या या भामट्याच नाव नदीम आलम आहे. नदीम बीबीसी वर्ल्ड न्यूज, बीबीसी एशियन नेटवर्क आणि रेडियो फाइव येथे एक्सपर्ट बनून क्रिकेटचं ज्ञान जगाला देत होता. आश्चर्याची बाब म्हणजे पूर्व भारतीय क्रिकेटर आकाश चोपड़ा सोबत सुद्धा हा चर्चेत सहभागी झालेला आहे.
जेव्हा बीबीसीला ही गोष्ट कळाली तेव्हा बीबीसीने नदीम अब्बासी यांची माफी मागितली. जर मला नदीम आलम कुठे भेटला तर पाकिस्तानच्या सन्मानाला धक्का दिल्याबद्दल मी त्याच्या मुस्काटात मारेल, असं मत नदीम अब्बासी यांनी व्यक्त केलं आहे.
नदीम अब्बासी पाकिस्तानसाठी १९८९ मध्ये तीन टेस्ट मॅच खेळले आहेत. नदीम अब्बासी कधी टीव्हीवर आले नाही म्हणून प्रेक्षकही त्या भामट्याला ओळखू शकले नाही. नदीम आलम हा फक्त त्याच्या होम टाऊन ह्यूडर्सफील्ड खेळला आहे. ह्यूडर्सफील्ड इंग्लडच्या यॉर्कशायरचा भाग आहे.