www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
नाशिकमध्ये ऑनर किलिंगची घटना उघडकीस आलेय. वडिलांनीचे आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांची मुलगी नऊ महिन्यांची गरोदर होती.
मुलीने आंतरजातीय विवाह केल्यानं त्यांच्या मनात राग होता. त्यांनी मुलीचा काटा काढण्यासाठी बाहाणा केला. आजारी असल्याचे सांगून मुलीला फसवून रिक्षातून घरी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीला याबाबत काहीही माहिती नव्हती. वडिलांनी तिला रिक्षातून बाहेर नेलं आणि रिक्षातच तिचा गळा आवळून खून केला.
प्रमिला हिने काही वर्षांपूर्वी घरच्यांच्या मनाविरुद्ध आतंरजातीय विवाह केल्याचे सांगण्यात येते. याचा वडिलांनी राग होता. यारागापोटी तिला संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वडिल एकनाथ किसन कुंभारकर तिच्या घरी आले. मोरेमाळा येथील त्यांच्या राहत्या घरातून निघताना, त्यांनी शेजारीच राहणाऱ्या रिक्षावाल्याला सांगितले की, आमचे एक नातेवाइक हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना पाहायला जायचे आहे आणि रिक्षा बाहेर काढली.
रिक्षावाल्याला वाटेत सांगितले, माझी मुलगी कामगार नगरमध्ये राहते. तिलाही घेऊन जायचे आहे. त्यानुसार रिक्षा तिच्या घरी नेली. मुलीला बहाणा करून सांगितले. तिला आपल्यासोबत रिक्षात बोलावले. दोघांसह रिक्षा जोशीवाड्यातील एका हॉस्पिटलसमोर उभी राहिली.
हॉस्पिटलसमोर कुंभारकर यांनी रिक्षावाल्याला सांगितले की, जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करून ये. चौकशीसाठी रिक्षावाला हॉस्पिटलच्या इमारतीत शिरताच कुंभारकर यांनी सोबत घेतलेल्या दोरीने मुलीचा गळा आवळला.
रिक्षावाल्याने कांबळे यांना तातडीने सरकारी रुग्णालयात नेले. पण तेथे त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आले. सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, वडील एकनाथ कुंभारकर यांना अटक करण्यात आली आहे.
मुलीनं आंतरजातीय विवाह केला होता. याचा राग मनात धरून वडिलांनी हत्या केल्याचं प्रथम दर्शनी कळतय. या प्रकारामुळे नाशिकमध्ये धक्का बसलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.