''नीट'बाबत गरज पडल्यास राष्ट्रपतींची भेट घेणार'

NEETचा घोळ सोडवण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत सोमवारी सर्व राज्यांच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची बैठक होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काय पर्याय आहे, याची चाचपणी या बैठकीत होणार असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय. तसंच नीटबाबत योग्य प्रशिक्षण देण्याचा विचारही या बैठकीत केला जाणार आहे.

Updated: May 14, 2016, 09:28 PM IST
''नीट'बाबत गरज पडल्यास राष्ट्रपतींची भेट घेणार' title=

मुंबई : NEETचा घोळ सोडवण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत सोमवारी सर्व राज्यांच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची बैठक होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काय पर्याय आहे, याची चाचपणी या बैठकीत होणार असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय. तसंच नीटबाबत योग्य प्रशिक्षण देण्याचा विचारही या बैठकीत केला जाणार आहे.

बैठकीतून ठोस काही हाती न लागल्यास प्रसंगी राष्ट्रपतींची भेटही घेण्याचा विचार असल्याचं तावडेंनी म्हटलंय... तर सर्वोच्च न्यायालयानं विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.