'एअर इंडिया'त विमान कर्मचाऱ्यांची नोकर भरती!

'एअर इंडिया' या हवाई वाहतूक कंपनीचा विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी विमान कर्मचाऱ्यांची नोकर भरती करण्यात येणार आहे. ५०० वैमानिकांसह १५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची (केबिन क्रू) भरती येणार येणार आहे, असे पीटीआयने म्हटलेय.

Updated: Jul 27, 2016, 06:34 PM IST
'एअर इंडिया'त विमान कर्मचाऱ्यांची नोकर भरती! title=

मुंबई  : 'एअर इंडिया' या हवाई वाहतूक कंपनीचा विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी विमान कर्मचाऱ्यांची नोकर भरती करण्यात येणार आहे. ५०० वैमानिकांसह १५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची (केबिन क्रू) भरती येणार येणार आहे, असे पीटीआयने म्हटलेय.

आगामी दोन ते तीन वर्षांत केबिन क्रू भरती करण्यात येणार आहे.  'एअर इंडिया' आपली विमान सेवा गतिमान करण्यासाठी आणि विमानांची संख्या वाढविण्यासाठी ही मेगा भरती करण्यात येत आहे.

'एअर इंडिया'च्या ताफ्यात पुढील वर्षी आणखी १०० नवी विमाने दाखल होणार आहेत. त्यामुळे अधिक कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. ५०० वैमानिकांच्या भरतीसंदर्भातील जाहीरात प्रसिद्ध झाल्याचे सांगण्यात आले आहे.