भाजप आमदारांनी आक्रमक व्हा, विधीमंडळ बैठकीत निर्णय

भाजपच्या विधीमंडळ बैठकीत आक्रमक होण्याचा सल्ला भाजप आमदारांना देण्यात आला आहे. 

Updated: Jul 27, 2016, 04:26 PM IST
भाजप आमदारांनी आक्रमक व्हा,  विधीमंडळ बैठकीत  निर्णय title=

मुंबई : भाजपच्या विधीमंडळ बैठकीत आक्रमक होण्याचा सल्ला भाजप आमदारांना देण्यात आला आहे. 

'आक्रमक उत्तर द्या'

विधीमंडळमच्या सर्व भाजप सदस्यांची बैठक पार पडली. गेले आठवडाभर विरोधकांनी भ्रष्टाचारचे आरोप असलेल्या मंत्र्यांच्या न्यायालयीन चौकशीचा मुद्दा लावून धरला आहे. तेव्हा त्याला आक्रमक उत्तर देण्याचे आदेश बैठकीत भाजप आमदारांना देण्यात आले. 

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मौन

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत मात्र यावेळी मौन बाळगण्यात आलं, याचा उल्लेख टाळण्यात आला, असं असलं तरी भाजप, वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर उत्तर देईल किंवा याबाबतीत कटशहा राजकारण करेल, भाजप आमदारांनी पक्ष आणि कामांकड़े लक्ष द्यावे असे अप्रत्यक्ष सांगण्यात आल्याचं भाजप आमदारांनी सांगितले.

२० आमदार माघारी

दरम्यान, भाजपआमदारांची बैठक सुरु झाली आणि सुमारे ४० मिनिटे चालली. बैठक सुरु झाल्यावर १५ मिनिटांनी दरवाजे बंद करण्यात आले. यामुळे जवळपास २० भाजप आमदार यांना परत फिरावे लागेल, यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांचाही समावेश होता. बैठकीतील पक्षशिस्त आणि नियमाचा हा भाग असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदारांनी दिली.