मुंबई : शिवसेना-भाजपची युती तुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. शिवसेनेनं भाजपला 95 जागा देऊ केल्या असल्या तरी भाजपनं शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक असलेल्या 40 जागांवर दावा ठोकल्यामुळं युती तुटण्याची चिन्ह आहेत.
युती होणार नसेल तर ती मैत्रिपूर्ण वातावरणात तोडण्याचा निर्णयही दोघा पक्षांनी घेतल्याचं समजतंय. शिवसेनेनं संपूर्ण 227 उमेदवारांसंदर्भात आणि प्रचार सभांची रणनिती ठरवण्यासाठी मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत युतीसंदर्भातही चर्चा झाली. युतीबाबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेणार असल्याची माहिती खासदार गजानन किर्तीकर यांनी दिली.