भाजपमध्ये विविध राजकीय पक्षांतून इनकमिंग सुरुच

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये विविध राजकीय पक्षांतून इनकमिंग सुरुच आहे. 

Updated: Jan 24, 2017, 07:44 AM IST
भाजपमध्ये विविध राजकीय पक्षांतून इनकमिंग सुरुच title=

मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये विविध राजकीय पक्षांतून इनकमिंग सुरुच आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या तीन विद्यमान नगरसेवकांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. जोगेश्वरीतले मनसे नगरसेवक भालचंद्र आंबुरे, चांदिवलीतल्या शिवसेनेच्या लीना शुक्ला आणि मालाड पश्चिममधले काँग्रेसचे परमिंदर सिंह यांनी भाजपात प्रवेश केला. 

याचवेळी मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे आणि काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे हे सुद्धा भाजपमध्ये डेरेदाखल झाले. तर अभिनेता दलीप ताहील हे सुद्धा भाजपमध्ये आले.