जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम - अनिल देसाई

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केलंय. तर मुख्यमंत्र्यांच्या बीएमसी निवडणूक सेना-भाजप एकत्र लढणार या भूमिकेचंही देसाई यांनी स्वागत केलंय. पत्रकार परिषदेत देसाई यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय.

Updated: May 25, 2015, 01:39 PM IST
जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम - अनिल देसाई title=

मुंबई: जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केलंय. तर मुख्यमंत्र्यांच्या बीएमसी निवडणूक सेना-भाजप एकत्र लढणार या भूमिकेचंही देसाई यांनी स्वागत केलंय. पत्रकार परिषदेत देसाई यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय.

या प्रकल्पामुळं जर स्थानिक लोकांचं हित नसेल तर अशा विकासाचा फायदा काय? असा सवाल देसाई यांनी यावेळी उपस्थित केला.
 
दरम्यान, कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप एकत्र लढणार, असं वक्तव्य केलं. त्यांची ही भूमिका स्वागतार्ह आहे, असं अनिल देसाई म्हणाले. भाजप स्वबळावर लढल्याने ताकद वाढली या मुख्यमंत्र्यांच्या विधानात काहीही गैर नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अशी विधानं करावी लागतात. पण शिवसेना- भाजप एकत्र लढणार हे विधान जास्त महत्त्वाचं आहे, असंही देसाई म्हणाले.
 
तर वसई- विरार महापालिकेतील युतीबद्दल आज किंवा उद्या निर्णय होईल, असं देसाईंनी स्पष्ट केलं. याबाबत आज दुपारी शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये ठाण्यात बैठक होत आहे. 

 अनिल देसाई पत्रकार परिषदेतील मुद्दे -

- बँक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा द्विपक्षीय करार झाला
- इंडियन बँक असोसिएशन आणि सात मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनांबरोबर करार
- बँक कर्मचाऱ्यांना सरासरी १५ टक्के पगारवाढ मिळणार
- ३२ महिन्यांची पगारवाढीची थकबाकी मिळणार
- प्रत्येक महिन्याचा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहणार
- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँकांचे व्यवहार अर्ध्या दिवसाऐवजी पूर्ण दिवस सुरू राहणार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.