मुंबई एअरपोर्टवर संशयित पॅराशूट, सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेच. गुप्तचर विभागाचे अहवालही तसे आहेत. त्यामुळंच एखादा संशयास्पद प्रकार समोर येतो सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडते. असाच ताजा प्रकार मुंबईत शनिवारी सायंकाळी घडलाय. मुंबई विमानतळावर संशयास्पद पाच पॅराशूट दिसल्यामुळं सुरक्षा यंत्रणा सतर्क झालीये. 

Updated: May 25, 2015, 11:49 AM IST
मुंबई एअरपोर्टवर संशयित पॅराशूट, सुरक्षा यंत्रणा सतर्क title=
फाईल फोटो

मुंबई: मुंबई दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेच. गुप्तचर विभागाचे अहवालही तसे आहेत. त्यामुळंच एखादा संशयास्पद प्रकार समोर येतो सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडते. असाच ताजा प्रकार मुंबईत शनिवारी सायंकाळी घडलाय. मुंबई विमानतळावर संशयास्पद पाच पॅराशूट दिसल्यामुळं सुरक्षा यंत्रणा सतर्क झालीये. 

गंभीर बाब म्हणजे रिमोट कंट्रोलच्या सहाय्यानं या पॅराशूटचं नियंत्रण केलं जात होतं. जेट एअरवेजचे पायलट कॅप्टन दिशेन कुमार यांनी प्रथम हे संशयास्पद पॅराशूट पाहिलेत. सहा मिनीटं ते विमानतळ परीसरात दिडशे फूट उंचीवर होते. त्यानंतर त्यांनी दिशा बदलली. 

एअर ट्रँफिक कंट्रोलनं या घटनेची नोंद घेतलीय. दरम्यान या घटनेची गंभीर दखल पंतप्रधान कार्यालयानं घेतलीय. गुप्तचर विभागासह नौदल आणि मुंबई पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.