संगीतातला विशुद्ध सूर हरपला - शरद पवार

भारतीय शास्त्रीय संगीतक्षेत्रातील विशुद्ध सूर हरपला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी किशोरीताईंना आदरांजली वाहिलीय.

Updated: Apr 4, 2017, 01:29 PM IST
संगीतातला विशुद्ध सूर हरपला - शरद पवार  title=

मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीतक्षेत्रातील विशुद्ध सूर हरपला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी किशोरीताईंना आदरांजली वाहिलीय.

किशोरीताईंच्या सूरांचे आपण स्वतः एक निःसीम चाहते असल्याचं पवारांनी म्हटलंय. त्यामुळे किशोरीताईंच्या जाण्याने संगीत रसिकांना झालेल्या दुःखाची आणि भारतीय शास्त्रीय संगीतक्षेत्रात निर्माण झालेल्या पोकळीची कल्पना येऊ शकते, अशा शब्दांत पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही किशोरीताईंना श्रद्धांजली वाहिलीय.