भारतीय क्रिकेट आणि मनोरंजन यांचं एक घट्ट नातं आहे. अनेकवर्षांपासून या दोन्ही क्षेत्रातील मंडंळींचं प्रेम आणि त्यांची लव्हस्टोरी आपण अनुभवली आहे. आतापर्यंत या दोन्ही क्षेत्रांनी अनेक कलाकांचं प्रेम आणि नाते अनुभवलं आहे. हा सिलसिला अगदी शर्मिला टागोर-मनसूर अली खान ते अगदी सागरिका घाटगे-झहीर खान यांच्या लग्नापर्यंत अनुभवलं आहे.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने आपल्या गोलंदाजीने मैदानातील सर्वात मोठ्या फलंदाजांना क्लीन बोल्ड केले होते. 2012 मध्ये या क्रिकेटपटूने एका लोकप्रिय अभिनेत्रीला नो-बॉल टाकला होता. क्रिकेटमधील यशस्वी कारकीर्द असूनही, झहीरला प्रेमात मात्र अनेक चढ-उतार अनुभवावे लागले. अभिनेत्री ईशा शर्वानीशी डेटिंग केल्यानंतर आठ वर्षांनी त्यांचं ब्रेकअप झालं. पण अखेर झहीर खानला त्याच्या जीवनातील 'चक दे' सापडलीच.
सागरिका घाटगे ही झहीर खानची दुसरी चॉईस आहे. झहीर खान आठ वर्ष अभिनेत्री ईशा शर्वानीला डेट करत होता. दोघं लिव्ह इनमध्ये देखील राहत होते. लग्न करणारच होते पण या दोघांमध्ये नेमकं काय झालं कळलं नाही पण लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
(हे पण वाचा - राजघराण्यातील लेकीने झहीर खालशी लग्न केल्यावर का सोडली इंडस्ट्री?)
सागरिका आणि झहीर खान कॉमन फ्रेंडच्या मदतीने भेटले. या दोघांमध्ये छान ओळख झाली. त्यानंतर चांगली मैत्री आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण या दोघांनी आपलं नातं अतिशय खासगी ठेवण्याचा निर्णय घेतला. झहीर खान आणि सागरिका घाटगे यांची भेट एका बॉलिवूड पार्टीत कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून झाली होती. काही काळानंतर दोघेही नियमितपणे एकमेकांना भेटू लागले आणि लवकरच डेटिंग करू लागले. झहीरने सागरिकाला डिनरसाठी बोलावले होते आणि त्यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले. काही काळानंतर झहीरने सागरिका घाटगेला प्रपोज केले आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर नात्यात झाले. अखेर सागरिकाने झहीरचा प्रस्ताव स्वीकारला आणि दोघेही एकत्र लोकांसमोर दिसू लागले. झहीरचा दीर्घकाळचा जोडीदार, माजी भारतीय फलंदाज युवराज सिंगच्या लग्नात हे दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते.
जेव्हा झहीर सागरिकासोबत रिलेशनशिपमध्ये आला, तेव्हा दोघांनीही ते खूप काळ खाजगी ठेवले. मीडियासमोर ते एकमेकांच्या नात्याबद्दल फारसे बोलले नाहीत. एप्रिल 2017 मध्ये, सागरिकाने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे घोषणा केली की त्या दोघांनी एंगेजमेंट केली आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्येच दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते.