निवासी डॉक्टरांनी धरली राज्याची आरोग्य यंत्रणा वेठीस

आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारत ४००० निवासी डॉक्टरांनी राज्याच्यी आरोग्य यंत्रणा वेठीला धरली आहे. त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तरीही डॉक्टर संपावर गेलेत, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Updated: Jul 2, 2015, 01:37 PM IST
निवासी डॉक्टरांनी धरली राज्याची आरोग्य यंत्रणा वेठीस title=

मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारत ४००० निवासी डॉक्टरांनी राज्याच्यी आरोग्य यंत्रणा वेठीला धरली आहे. त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तरीही डॉक्टर संपावर गेलेत, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे.

विविध मागण्यांसाठी मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं ही बेमुदत संपाची हाक दिली आहे.  राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत मार्डच्या प्रतिनिधींची काल तब्बल दोन तासाहून अधिक काळ बैठक झाली. मात्र या चर्चेत कोणताही तोडगा निघू शकला नाही.

डॉक्टरांचे कामाचे तास, सुरक्षा, टीबी आणि प्रसुतीसाठी पगारी दोन महिन्यांची सुट्टी, अशा काही मागण्या मार्डनं केल्या होत्या. मात्र त्या मागण्यांबाबत समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही. आजपासून संपावर गेलेल्या डॉक्टरांमुळे सामान्य रुग्णांचे हाल झाले आहेत. डॉक्टरांच्या बहुतेक मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. मात्र, हे डॉक्टर अडून बसले आहेत, असे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.