पंकजा मुंडे पुन्हा अडचणीत, गंभीर आरोप असलेला स्वागताला

राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होतानाच दिसत आहे. गंभीर आरोप असलेला निलंबित अधिकारी मुंडे यांच्या स्वागताला विमानतळावर त्यांच्या शेजारी दिसत होता.

Updated: Jul 2, 2015, 02:30 PM IST
पंकजा मुंडे पुन्हा अडचणीत, गंभीर आरोप असलेला स्वागताला title=

मुंबई : राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होतानाच दिसत आहे. गंभीर आरोप असलेला निलंबित अधिकारी मुंडे यांच्या स्वागताला विमानतळावर त्यांच्या शेजारी दिसत होता.

पंकजा यांच्या कथित चिक्की घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच एका आरोपी अधिकाऱ्याच्या जवळिकीमुळे त्या नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. पंकजा अमेरिकेतून परतल्या असता मुंबई विमानतळावर त्यांच्या स्वागताला अनेक पाठिराखे जमले होते. त्यातच राजेंद्र शिरसाठ हा राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचा निलंबित अधिकारी होता.

महिला सहकाऱ्याचं लैंगिक शोषण आणि तक्रार मागे घेण्यासाठी लाचखोरी असे गंभीर आरोप या शिरसाठवर आहेत. तो केवळ पंकजा मुंडेंच्या स्वागतालाच आला नव्हता, तर त्यांच्या अगदी जवळ पोहोचला होता. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

मंत्र्यांना असलेलं सुरक्षा कवच भेदून हा आरोपी तिथं पोहोचतोच कसा, त्याच्यावर असलेल्या गंभीर आरोपांची पंकजा मुंडेंना माहिती नव्हती का, असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.