ऑक्टोबर हिट आणखी आठवडाभर : कुलाबा वेधशाळा

ऑक्टोबर हिटने अंगाची लाही केलेय. ऑक्टोबर महिना संपत आला तरी अंगाची लाही लाही सुरुच आहे. ही लाही आणखी आठवडाभर सुरुच राहिल, असेच दिसतेय. कुलाबा वेधशाळेने आठवडाभर हिट कायम राहिल, असे स्पष्ट केलेय. 

Updated: Oct 24, 2015, 10:26 AM IST
ऑक्टोबर हिट आणखी आठवडाभर : कुलाबा वेधशाळा title=

मुंबई : ऑक्टोबर हिटने अंगाची लाही केलेय. ऑक्टोबर महिना संपत आला तरी अंगाची लाही लाही सुरुच आहे. ही लाही आणखी आठवडाभर सुरुच राहिल, असेच दिसतेय. कुलाबा वेधशाळेने आठवडाभर हिट कायम राहिल, असे स्पष्ट केलेय. 

ऑक्टोबर हिटचा परिणाम आणखी आठवडाभर जाणवेल, अशी शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. यंदाच्या पावसाळ्यावर अल निनोचा परिणाम झालाय. त्यामुळे ऑक्टोबरमध्येही सरासरीपेक्षा ३ अंश जास्त तापमान अनुभवायला येतंय. यंदाचा ऑक्टोबर महिना सर्वाधिक उष्ण ठरण्याची शक्यता आहे. मुंबईचे तापमान ३६ ते ३८ च्या दरम्यान आहे.

कडक उन्हामुळे उन्हाळा हा नकोसा वाटतो. या वर्षी तर त्याची झळ अधिक तीव्र असणार हे स्पष्ट दिसत आहे. दुष्काळग्रस्त भागात तर जगणे असह्य होणार आहे. उन्हाळा म्हटले की, उष्णतेचे विकार चालू होतात. त्यामुळे उन्हाळ्यावर मात करण्यासाठी भरपूर पाणी प्या, असा सल्ला डॉक्टर देतात. पाणी हेच जीवन आहे, त्यामुळे उन्हाळ्यात जास्त पाणी प्या. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.