गुड न्यूज: आता गॅस कनेक्शन मिळणार ऑनलाइन

आता नव्या गॅस कनेक्शनसाठी आता गॅस एजन्सीत जाऊन नंबर लावण्याची गरज नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ऑनलाईन गॅस कनेक्शन देण्याची सुविधा रविवारी सुरू करण्यात आलीय. या सुविधेसह आता २ किलोचं गॅससिलेंडरही आता ऑनलाइन मिळणार आहे. 

Updated: Sep 1, 2015, 11:58 AM IST
गुड न्यूज: आता गॅस कनेक्शन मिळणार ऑनलाइन title=

मुंबई: आता नव्या गॅस कनेक्शनसाठी आता गॅस एजन्सीत जाऊन नंबर लावण्याची गरज नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ऑनलाईन गॅस कनेक्शन देण्याची सुविधा रविवारी सुरू करण्यात आलीय. या सुविधेसह आता २ किलोचं गॅससिलेंडरही आता ऑनलाइन मिळणार आहे. 

आणखी वाचा - पेट्रोल २ रूपये, डिझेल ५० पैशांनी स्वस्त

या योजनेचं नाव 'सहज' आहे. या माध्यमातून नागरिकांना गॅस कनेक्शन ऑनलाइन बुक करता येणार असून गॅसची शेगडी आणि सिलेंडर थेट घरात येणार आहे. मुंबईसह देशातील प्रमुख १२ शहरांत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक गॅस पुरवठादार कंपनी आणि सरकारच्या वेबसाइटवर गॅस कनेक्शन बुक करता येणार आहे. केवळ गॅस कनेक्शनच नव्हे तर त्यासंबंधीत सर्व पेमेंटही ऑनलाइन करता येणार आहे. ही वेबसाइट संबंधित ग्राहकाला थेट त्याच्या विभागातील गॅस डिस्ट्रिब्युटरशी जोडून देणार आहे. यामुळं डिस्ट्रिब्युटर शोधण्यासाठीचा वेळही वाचणार आहे. विशेषत: कामावर जाणार्‍या जोडप्यांसाठी ही सुविधा अधिक उपयोगी ठरणार आहे.

आणखी वाचा - मेडिकल, इंजिनीअरिंगसाठी आत एकच सीईटी, तावडेंचा निर्णय

दोन किलोचं हे सिलेंडर स्थानिक किराणा दुकनांमध्ये उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे. या सुविधेमुळे खेड्यापाड्यावरच्या नागरिकांना मोठा फायदा होईल असं पेट्रोलियम मंत्रालयाचा दावा आहे. पण योजना लागू करण्याआधी सुरक्षिततेचे सर्व नियम तपासण्यात येत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.