मुंबई : महाराष्ट्र केबल ऑपरेटर फेडरेशनने हॅथवेचा जोरदार निषेध केलाय. गेल्या 1 ऑगस्टपासून हॅथवेने, कुठलीही पूर्वसूचना न देता, तडकाफडकी झी नेटवर्कची सर्वच्या सर्व चॅनेल्स बंद केली. त्यामुळं केबल ऑपरेटरच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचणारी झीची सर्व चॅनेल्स दिसणं बंद झालंय.
या पार्श्वभूमीवर झी नेटवर्कची विविध चॅनेल्स का दिसत नाहीत, असा तगादा झी च्या प्रेक्षकांनी केबल ऑपरेटरकडे लावायला सुरूवात केली होती. केबलच्या पॅकेजचे पैसे देऊनही झीची चॅनेल्स बंद का केलीत, असा प्रश्नही झी च्या प्रेक्षकांनी विचारायला सुरूवात केलीय.
केबल ऑपरेटरच्या संघटनेनं याबाबत तडकाफडकी बैठक बोलावून, याप्रकरणी हॅथवेला निवेदन दिलं. मात्र, हॅथवेकडून कोणतंही समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं केबल ऑपरेटर फेडरेशननं तीव्र संताप व्यक्त केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.